Sunday, 25 July 2010

शब्द

शब्द


व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला शब्दतिला आठवायचा नाही ..!!

"माझी आई"

"माझी आई"

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"
तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे......