Sunday, 17 October 2010

आई फ़क्त तुझ्यासाठी.......










Wednesday, 1 September 2010

बाप्पा एवढं मागणं....

'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं ',
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं',
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव',
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव ',
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती ',
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती ',
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं ',
'आईबापाचं कधीही फ़िटणारं देणं ',
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर ',
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार ',
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान',
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

Monday, 30 August 2010

my crazy mind

  1. तारुण्यातला सर्वोच्च ध्येय - पैसे कमावणे नाही....तर आत्म यज्ञ करणे
  2. आग लगी है बस्ती मे....सब है अपनी ही मस्ती मे....
  3. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे नसतो करायचा..... तर त्यच्या दोन्ही थोबाडीत मारायचा.....
  4. पहिला गुलाबजाम जितका गोड लागतो तितके पुढचे लागत नाहीत. जेवण कितीही सुंदर झाला तरी पहिल्या घासाची चव लक्षात राहते. तसच संसाराचही आहे. ( बियरचं तसं नसतं, पहिल्या घोटा इतकाच शेवटचा घोट झकास लागतो. किंबहुना, कुठलाच घोट शेवटचा असू नये असं वाटतं. त्यामुळे ' संसार हा मिठाई सारखा गोड नसून बियर सारखा फेसाळता हवा' असं सुचला आहे....)
  5. As soon as u say ‘love’, u want ‘marriage’ n then u want to make the whole thing legal.U want to make love legal! So love becomes just that—a piece of paper, a signature! Only fools think in terms of legalites; otherwise, love is enough. If love becomes your marriage, good; but don't hope that marriage can bring love. Marriage is the “coffin of love”, said Osho widely. Sociologists too have declared that the institution of marriage has been a universal failure.The choice is yours!
  6. आपली काही क्षणांची मैत्रीण.....ही अनंतकाळा साठी तिच्या नवर्याची पत्नी असते....
  7. The best time to plant a tree was 20 years ago. But the second best time is today
  8. पुढच्या पिढीत निष्क्रिय बीज रोऊ नका....
  9. !!!...बांध के पगडी जब शिवाजी महाराज तयार होते , उठाकर तलवार जब घोडे पे सवार होते,झुकते सब आल्हा के बन्दे और कहते काश हम भी मराठा होते...!!!
  10. मित्रं मोठी होऊ लागली आहेत....दुरावा जाणवायला लागला आहे.....
  11. मराठी माझा श्वास आहे आणि हिंदुत्व माझा प्राण...
  12. महाराष्ट्रात मी मराठी आहे आणि भारतात मी भारतीय.....
  13. Plant at least 5 trees when there is a birth in your family...cos after you die you will need one tree...
  14. ...first save them and then worship them...
  15. ...my company is very professional except about salary, increment, work, management, timings & holidays && work management....& much more....
  16. ...in todays meeting we just discussed what is to be discussed in next meeting...
  17. ....so you say Rahul (Vinci) Gandhi is your youth leader...so watch this http://www.youtube.com/watch?v=z5As3uAc0vU&feature=player_embedded
  18. best opportinuity...HURRY....Become a Terrorist against India get paid by Government...
    http://www.youtube.com/watch?v=NK6xwFRQ7BQ
  19. life is practical and thats my conclusion..
  20. देवा मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे....
  21. ...आम्ही एक प्रगत राष्ट्र करायचं की नाही....की फक्त एक निष्काळजी आणि सुस्त समाज म्हणून जगायचं???
  22. '...Kashmir was awarded to India during partition...' - British Government
  23. तात्याराव सावरकर; सुर्याची उबदार प्रखरता, वार्‍याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृह्स्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्बता या सर्वांनी धारण केलेला मानवीय अवतार म्हणजे तात्याराव सावरकर.
  24. There is no point in talking about humanity when we are under attack. We have to cherish 'nationalism' in each and every Indian.
  25. अभी जिसका खून न खौला,
    वो खून नहीं पानी है|
    जो देश के काम न आये,
    बेकार वो जवानी है||
  26. ....आपला होणारा मुलगा किंवा मुलगी आपल्याला 'आई बाबा' च हाक मारावी असा मराठी बाणा असतो......पण मराठी समाजाची बैठक असेल किंवा देणगी मागितली की आंगावर झुरळ पडते.........
  27. I like limitations, they make me think beyond it.....
  28. the greatest pleasure in my life is doing something what people says I can't do.
  29. I do what I like, there may be no logic behind it..
  30. Aye barish jara tham ke baras, Jab mera yaar aaye tab jam ke baras, Pehle na baras ki woh aa na sake, Phir itna baras ki who ja na sake.

Sunday, 25 July 2010

शब्द

शब्द


व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला शब्दतिला आठवायचा नाही ..!!

"माझी आई"

"माझी आई"

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"
तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे......